कला प्रसारक संस्था


संगीत, कला, साहित्य या संबंधी काम करणारी संस्था

जाणून घ्या

संस्थेबद्दल


संगीत, कला, साहित्य या संबंधी काम करणारी संस्था

धारेश्वर संगीत महोत्सव (Dhareshwar Sangeet Mahotsav)


स्वर्गीय विदुषी मीनाताई बर्वे दर २१ ऑगस्टला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करायच्या. २०१३ पासून त्यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे शिष्यांनी हा कार्यक्रम पुण्यामध्ये करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन कार्यक्रम धायरीमध्ये असल्याने त्याचे नामकरण "धारेश्वर संगीत महोत्सव" असे झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपंरा जपली जावी आणि त्यामध्ये अधिकाधिक नव्या रसिकांची भर या महोत्सवाच्या निमित्ताने पडावी यासाठी संस्था प्रयत्नशील राहील. आतापर्यंत विदुषी मंजिरी आलेगावकर, विदुषी पौर्णिमा धुमाळे, पं राजेश दातार, श्री अमर ओक अशा मध्य कलाकारांचे सादरीकरण या मंचावर झाले आहे. दर वर्षी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहणारे रसिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असल्याचे द्योतक आहे.

स्वरहंडी (Swarahandi)


दहीहंडीच्या निमित्ताने रात्रभर चालणाऱ्या या मैफिलींमध्ये संस्थेतर्फे हौशी गायकांना आणि वादकांना सादरीकरण करण्यासाठी आवाहन केले जाते. एकामागून एक गीते सादर केली जातात. सायंकाळी ७ ला सुरु होणारी ही मैफिल सकाळी ८ नंतर संपते. परिसरातील संगीतप्रेमी नागरिक रात्रभर गाण्यांचा आस्वाद घेतात. या सर्व हौशी गायक सदारकर्त्यांसाठी वादकांची सोय संस्थेतर्फे केली जाते. अनेक स्वयंसेवक वादक यामध्ये योगदान देतात.

कला प्रसारक संगीत स्पर्धा (Kala Prsarak Sangeet Spardha)


संगीत शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि हौशी कलाकारांचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे. सोलो, ड्युएट, समूह या ३ मुख्य प्रकारात स्पर्धक भाग घेऊ शकतात. यामध्ये पुढे गायन आणि वादन आणि नृत्य असे तीन विभाग आहेत. या विभागांमध्ये पुढे अनेक उपप्रकार आहेतच . याशिवाय ६ वेगवेगळे वयोगटसुद्धा आहेत. या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा क्रमांक (रँकिंग) ठरविताना नेहमीपेक्षा खूपच वेगळी पद्धत वापरली जाते. या पद्धतीमुळे स्पर्धाभावनेबरोबरच “माझी स्पर्धा माझ्याशीच आहे” ही जाणीव दृढ होण्यास मदत होते.

वाद्यसंजीवनी (Vadyasanjeevani)


आपल्या परिचयातील कोणाकडे जुने वापरात नसलेले कोणत्याही स्थितीतील वाद्य आहे का?
जुने वापरात नसलेले वाद्य (तबला, हार्मोनियम, बासरी, पखवाज, गिटार, इत्यादी) आपण आम्हाला द्या.आम्ही या वाद्याला आमच्या खर्चाने सुस्थितीत आणू. असे वाद्य जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला रियाजासाठी देण्यात येईल. जेव्हा आपणांस वाटेल तेव्हा हे वाद्य सुस्थितीत संस्था आपणांस सुपूर्त करेल. दरम्यान कला प्रसारक संस्था श्रद्धेने वाद्याची देखभाल आणि नोंद ठेवेल.

इतर सांगीतिक कार्यक्रम (Other Musical Programs)


संस्था वर्षभर अनेक कार्यक्रम स्वतः आणि इतर संस्थांच्या सोबतीने करीत असते. अनेक ठिकाणी होणारे आषाढी एकादशी, गणपती उत्सव, दिवाळी पहाट, कविता वाचनाचे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.

संपर्क


भाग्यश्री गोसावी ( Bhagyashri Gosavi)
[email protected]
9405746419, 9225525352